आजचे भविष्य, २५ जानेवारी: लाभ-मान मिळेल!

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष: कमी वेळात अधिक लाभ, अशा एखाद्या योजनेत फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. अचानक धनलाभ संभवतो.

वृषभ: घर व संतती ह्यांच्याशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल. धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल. 

मिथुन: व्यापारासाठी शुभ फलदायी दिवस. यश मिळेल व येणी वसूल होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. अचानक धनलाभ संभवतो.

कर्क: आजच्या दिवसाचा प्रारंभ मानसिक तणाव व बेचैनीने होईल. दुपारनंतर मात्र मन प्रसन्न होईल. व्यापारी येणी वसूल होतील. प्रतिष्ठा लाभेल.

सिंह: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आचार विचारांवर संयम ठेवून अवैध गोष्टींपासून दूर राहणे हितावह राहील. अचानक धनलाभ होईल.

कन्या: मित्रांसोबत फिरणे, खाणे-पिणे, मनोरंजन होईल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील. अचानक धनलाभ झाल्याने काळजी दूर होऊ शकेल.

तूळ: दृढ मनोबल व आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती लाभेल. स्वभाव उग्र बनेल. सबब वाणीवर नियंत्रण ठेवा. 

वृश्चिक: मानसिक हळवेपणा वाढेल. मानसिक समतोल साधावा लागेल. अभ्यास व कारकीर्द ह्या संबंधी कामात विद्यार्थ्यांना यश मिळेल. 

धनु: आज कौटुंबिक शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद-विवाद टाळणे हितावह होईल. विद्यार्थ्यांना अनुकूल दिवस आहे. स्नेहीजनांशी जवळीक वाढेल.

मकर: महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ व स्थिर विचारांना अग्रस्थान द्यावे लागेल. मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल. भावंडांशी जवळीक वाढेल.

कुंभ: आज वाद होऊन कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राग व वाणी ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. खाण्या-पिण्यात संयम बाळगा. 

मीन: घरी एखादे मंगल कार्य होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कार्ये तडीस जातील. आजचा दिवस नवीन कामे हाती घेण्यास शुभ आहे. 

Click Here