जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: आर्थिक लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. व्यापारात लाभ होईल. सहलीचे यशस्वी नियोजन करू शकाल.
वृषभ: मानसिक तणावापासून मुक्तता मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-समाधान लाभेल. व्यापार-व्यवसायात यश मिळेल.
मिथुन: नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ कामगिरीवर नाखूष झाल्याने मानसिक त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील.
कर्क: मन अशांत व निरुत्साही राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पैशांची चणचण भासेल. आनंदासाठी खर्च होईल.
सिंह: मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील. सहलीस जाऊ शकाल. पैशाची चणचण भासेल.
कन्या: कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील.
तूळ: बौद्धिक क्षमतेमुळे लेखन किंवा अन्य विधायक कार्य करण्यात आघाडीवर असाल. यश व कीर्ती प्राप्त होईल.
वृश्चिक: स्वभावातील हट्टीपणा सोडल्यास अनेक समस्या सुटतील. आर्थिक योजना सहजपणे राबवू शकाल.
धनु: कुटुंबियांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. स्थावर मालमत्तेविषयक कागद पत्रांवर सही करताना काळजी घ्यावी.
मकर: वाद होण्याची शक्यता आहे. धार्मिक किंवा परोपकारी कार्यासाठी पैसा खर्च होईल. नशिबाची साथ मिळेल.
कुंभ: मन आनंदी राहील. अचानकपणे खर्च उद्भवतील. निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. विद्यार्थ्यांना अडचणी येतील.
मीन: कोणाशी आर्थिक व्यवहार करण्यास अनुकूल दिवस नाही. वाद संभवतात. मन एकाग्र होण्यात अडचणी येतील.