जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कार्यभार वाढेल. गृहसजावटीचे आयोजन कराल.
वृषभ: विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्रांकडून बातम्या समजतील. व्यापार्यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल.
मिथुन: दिवस प्रतिकूलतेचा. प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल. नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
कर्क: सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक दिवस. मौज-मजेची साधने, उत्तम दागीने व वाहन खरेदी होईल. सुखद अनुभव देईल.
सिंह: घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात अडचणी येतील. दैनिक कामात अडथळे येतील.
कन्या: संतती विषयक काही चिंता निर्माण होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. अचानक खर्च उद्भवतील. शेअर्स, लॉटरीत नुकसान होईल.
तूळ: सावध राहावे लागेल. वैचारिक सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. शक्यतो प्रवास स्थगित ठेवा. वेळेवर भोजन, पुरेशी झोप नसल्याने शारीरिक अस्वास्थ्य.
वृश्चिक: दिवसभर आनंदी राहाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. कोणत्याही कामात यश, आर्थिक फायदा, नशिबाची साथ, भावंडांकडून लाभ होतील.
धनु: कुटुंबीयांशी गैरसमज व मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. मानसिक चंचलता व द्विधा मनःस्थिती ह्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही.
मकर: प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी-व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. मानसिक शांती लाभेल.
कुंभ: आर्थिक व्यवहार तसेच जमीन-जुमल्यांच्या व्यवहारात कोणाला जामीन न राहणे हितावह राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मीन: मित्रांकडून लाभ होईल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र व वडीलधार्यांशी संपर्क साधू शकाल. अचानक धनलाभ.