जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: संपूर्ण दिवस आप्तेष्टांसह हर्षोल्हासात घालवू शकाल. नव्या वस्त्रांची व दागिन्यांची खरेदी करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान होतील.
वृषभ: दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. व्यवसायात सहकारी मदत करतील.
मिथुन: दिवस बौद्धिक कामे व चर्चा करण्यात जाईल. कल्पनाशक्तिस वाव मिळेल. आरोग्यास मात्र जपावे लागेल. व्यवसायात लाभ. कुटुंबात शांतता.
कर्क: शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात त्रास संभवतो. शांतता लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. उत्साह वाढेल. अतिविचाराने मन विचलित होईल.
सिंह: दिवस प्रवासास अनुकूल आहे. एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ संभवतो. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. नैराश्य येण्याची शक्यता आहे.
कन्या: मानसिक स्थिती द्विधा असल्याने नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. अनुकूल वातावरण निर्माण होईल.
तूळ: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दृढ विचार व वैचारिक संतुलन ह्यामुळे हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण करू शकाल. पैसा खर्च होईल.
वृश्चिक: संतापीपणा व अविचारीपणा ह्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. आत्मविश्वास वाढेल.
धनु: आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी आहे. नोकरीत बढती संभवते. लाभ होईल. विचारपूर्वक कामे न केल्यास अडचणीत येऊ शकाल.
मकर: दिवस आनंददायी. व्यापार -व्यवसायात वृद्धी संभवते. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. सहकारी उत्तम सहकार्य करतील. प्राप्तीत वाढ संभवते.
कुंभ: बौद्धिक काम, नवनिर्मिती व लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू करू शकाल. प्रवासाचे आयोजन करू शकाल. एखादा लाभ संभवतो.
मीन: कृतीवर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. चांगली बातमी मिळेल. शक्यतो वाद टाळावेत.