आजचे भविष्य, ०२ एप्रिल: यश-कीर्ती-लाभ

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष: दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल असून आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस. भेटवस्तू मिळतील. आनंदात वेळ जाईल.

वृषभ: बोलण्याच्या जादूने लोक प्रभावित होऊन फायदा होईल. मधुर भाषणाने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. मंगल कार्याची प्रेरणा मिळेल. 

मिथुन: द्विधा अवस्थेतील मन महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे अस्वस्थता अनुभवाल. अधिकतम हळवेपणा दृढतेला कमकुवत करेल. 

कर्क: भावंडांकडून लाभ होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नशिबाची साथ मिळेल. सामाजिक व आर्थिक सन्मान होतील.

सिंह: दिवस कुटुंबियासह सुखात घालवाल. सहकार्य मिळेल. विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र व स्नेही ह्यांच्याशी साधलेला संपर्क फायदेशीर ठरेल.

कन्या: दिवस लाभदायी. वैचारिक समृद्धी वाढेल. मैत्रीपूर्ण संबंध विकसित करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. 

तूळ: थोडा सुद्धा असंयम व अवैध व्यवहार अडचणीत टाकेल. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरेंशी पटणार नाही.

वृश्चिक: नोकरी-व्यवसायात लाभ प्राप्ती. मित्रांसह गाठीभेटी, प्रवास ठरवाल. लाभ होईल. भेटवस्तू मिळतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल.

धनु: यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण. सरकारकडून फायदा.

मकर: दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखनास अनुकूल. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल. व्यर्थ खर्च होईल. वाद टाळा.

कुंभ: वाणीवर संयम ठेवल्यास पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती व वस्तू ह्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहाल. आर्थिक चणचण जाणवेल.

मीन: सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान.

Click Here