जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मित्रांकडून लाभ होतील. अचानक धनलाभ संभवतो. संततीकडून लाभाची अपेक्षा बाळगू शकता.
वृषभ: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कामाच्या योजना यशस्वीपणे आखू शकाल. बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन: आज दिवसभर थोड्या प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. मानसिक चिंता राहील.
कर्क: आज आपल्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. कुटुंबियांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे.
सिंह: आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. धैर्याने वागावे.
कन्या: आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख-शांती नांदेल. मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील. आर्थिक लाभ होतील.
तूळ: आज आपण बौद्धिक कामे व चर्चा यांत अग्रस्थानी राहाल. कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल.
वृश्चिक: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जाणवेल. मनाला वेदना होतील. आर्थिक नुकसान, सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल.
धनु: आज एखाद्या गूढ व रहस्यमय विद्येचे आकर्षण होईल. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे. धनलाभ संभवतो.
मकर: आज उक्ती व कृती यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद, शेअर बाजारात गुंतवणूक, आर्थिक लाभ होईल.
कुंभ: आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. आर्थिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे.
मीन: आज आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहावे लागेल. एकाग्रता कमी असल्याने आपण बेचैन राहाल.