राेजच्या आहारापेक्षा उपवासाच्या दिवशी रताळ्याचा वापर अधिक केला जाताे. पण, रताळं किती गुणकारी आहे, हे तुम्हाला माहित्ये का?
श्रावणात उपवास करत असाल तर नक्कीच फराळामध्ये रताळ्याचा जास्तीत जास्त समावेश करा. रताळ्यामध्ये या गाेष्टींचा समावेश असताे.
रताळ्यामधून व्हिटॅमिन ए, सी, बी ६ बराेबरच फायबर आणि पाेटॅशियम मिळते. रताळ्याचे पाेषण मूल्य इतके जास्त आहे.
रताळं हे डाेळ्यासाठी खूप गुणकारी आहे. रताळ्यामुळे दृष्टी चांगली राहते. पण, वयानुसार हाेणारे डाेळ्याचे आजारांचा धाेकाही कमी हाेताे.
रताळ्यामुळे राेगप्रतिकारक शक्ती वाढते. रताळ्यात अँटीऑक्सिडन्ट आणि व्हिटॅमिन सी असते. याचा फायदा राेगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी हाेताे.
रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. याचा फायदा पचनासाठी हाेताे. बद्धकाेष्टता हाेत नाही. पचनशक्ती वाढल्याने आराेग्य चांगले राहते.
रताळ खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास आराेग्यास हानिकारक असते.
रताळ्याच्या सेवनामुळे स्किन चांगली हाेते. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे हा फायदा हाेताे. तसेच त्वचा तरूण दिसते.
रताळ खाल्यावर लवकर भूक लागत नाही. अशा गुणाकारी रताळ्याचा तुमच्या आहारात नक्कीच समावेश करा.