पार्टनरसाठी तुम्ही 'हे' करता का? 

तुमचं नातं टिकवण्यासाठी फक्त सरप्राईज, गिफ्ट्स यांचीच गरज नसते. त्यापेक्षा काही साध्या, साेप्या गाेष्टींची नात्याला जास्त गरज असते. 

शेड्यूल कितीही बिझी असेल, तरी राेज एकमेकांशी संवाद साधणे, गरजेचे आहे. राेज थाेडा वेळ काढून एकमेकांशी बाेला. 

नुसतंच बाेलणं नाही, तर लक्ष देऊन ऐकणे गरजेचे आहे. तुम्ही मध्ये प्रश्न देखील विचारले पाहिजेत. 

तुमच्या पार्टनरची तुम्हाला दैनंदिनी कामात मदत हाेते, त्याविषयी त्याचे आभार व्यक्त केले पाहिजेत. 

घरातल्या जबाबदाऱ्या, काम यामध्ये दाेघांनी एकत्र येऊन ते काम करणे आवश्यक असते. जबाबदारी विभागून घेतली पाहिजे. 

एखाद छाेटं सरप्राईज जसं की चिठ्ठी, एखादं चाॅकलेट दिल, तरी तुमच नातं घट्ट हाेण्यास मदत हाेते. 

माेबाईल बाजूला ठेवून एकमेकांसाेबत वेळ घालवणे खूप गरजेचे आहे. तुमच्या आवडत्या गाेष्टी एकत्र करून आनंद मिळवा.

एक दुसऱ्याच्या आवडी जपण्यासाठी काही गाेष्टी प्लॅन करायच्या, यामुळेही पार्टनर खूश हाेताे, तुमच नातं घट्ट हाेण्यास मदत हाेते.

Click Here