श्रावण महिना म्हणजे व्रत - वैकल्यांचा महिना. घरात मंगलमय वातावरण असत. तुमचा देव्हारा असा सजवा.
तेलाचे दिवे लावा. तुपाचे निरांजन देव्हाऱ्यात लावा. दिव्यांच्या मंद प्रकाशाने देव्हारा उजळल्याने मंगलमय वातावरण निर्माण हाेईल.
रंगीत विविध प्रकारची रांगाेळी काढा. रांगाेळीमुळे देव्हाऱ्याचे साैंदर्य वाढेल. त्याचबराेबरीने सकारात्मकता निर्माण हाेईल.
देव्हारा सजवण्यासाठी लाल, पिवळ्या रंगाचे पडदे किंवा कापडाचा वापर करू शकता.
देवांच्या मूर्ती, फाेटाेंना आभूषण घालू शकता. देवाला ताजी रंगीत फुलं वहा.
देवासाठी सुगंधी धूप आणि अगरबत्तींचा वापर करा. यामुळे घरात दरवळणाऱ्या सुंधनाने वातावरण प्रसन्न राहिल.
घरातल्या देव्हाऱ्याला खऱ्या फुलांच्या माळा, सुंगधी फुलांचे गजरे लावून डेकाेरेशन करू शकता.
पारंपरिक पद्धतीने तबक, ताम्हण सजवा. पूजा, आरतीसाठी खास सजावट करा.