मुलांचा स्क्रीन टाइम कमी कसा करावा?

मुलांचा स्क्रीन टाइम कसा कमी करावा याच्या काही टिप्स पाहुयात.

आजच्या डिजिटल युगात मुलं त्यांचा सर्वाधिक वेळ मोबाईलवर घालवू लागली आहेत. ज्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचालीदेखील कमी झाल्या आहेत.

मुलांचा स्क्रीन टाइम वाढल्यामुळे त्यांच्यात लठ्ठपणा, आळस, चिडचिडेपणा आणि हृदयासंबंधीचा त्रास वाढल्याचं दिसून येत आहे.

मुलांचा स्क्रीन टाइम कसा कमी करावा याच्या काही टिप्स पाहुयात.

मुलांसाठी तुम्ही आठवड्यातून एकदा फॅमिली डान्स पार्टीचं आयोजन करु शकता. मुलांना आवडतील त्या गाण्यावर त्यांना मनसोक्त डान्स करु द्या. यामुळे मुलं अॅक्टिव्ह राहतील. आणि, हृदयाचं आरोग्य सुधारेल.

मुलांसाठी तुम्ही विकली आऊटडोअर गेम्स प्लॅन करु शकता. यामुळे त्यांची शारीरिक हालचाल होईल. तसंच ते काही काळ मोबाईल, टिव्हीपासून लांब राहतील.

मुलांसोबत तुम्ही स्केटिंगला जाऊ शकता. यामुळे ते फ्रेश राहतील. तसंच क्रिकेट, बॅडमिंटन या सारख्या मैदानी खेळांमध्ये मुलांना सामील करा. 

मुलांना बागकामात सहभागी करून घ्या, जसं की झाडांना पाणी देणं,नवीन झाड लावणे, झाडांचं संगोपन करणे. यामुळे मुलं निसर्गाशी जोडले जातील.

हिरवी मिरची कच्ची खावी की तळून? 

Click Here