मुलांचा आत्मविश्वास वाढविण्याच्या टिप्स

लहान मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यामध्ये पालकांचा मोठा रोल असतो. 

लहान मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यामध्ये पालकांचा मोठा रोल असतो. कारण, लहान मुले आपल्या आई-वडिलांकडूनच अनेक गोष्टी शिकत असतात.

समाजात वावरत असतांना आत्मविश्वासाने वावरणे फार गरजेचं आहे. त्यामुळेच मुले लहान असल्यापासूनच त्यांच्या आत्मविश्वासाची भावना रुजवणे महत्त्वाचं आहे.

मुलांचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर पालकांनी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. प्रथम मुलांना कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती करु नका.

जर तुमचं मूल लाजाळू असेल त्याच्यावर कोणत्याही गोष्टीचं प्रेशर किंवा जबरदस्ती करु नका. त्याला वेळ द्या. त्याची मानसिक तयारी झाल्यानंतरच त्याला एखादी गोष्ट करु द्या.

मुलांना प्रोत्साहित करा. यासाठी तुमच्या आयुष्यातील, बालपणीचे काही किस्से, उदाहरणे त्यांना द्या. ज्यामुळे मुलांना एक्स्प्रेस व्हायला, भावना कंट्रोल करायला मदत मिळेल.

मुले आपल्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर वागतांना, बोलतांना काळजी घ्या. तुमच्या बोलण्यचा, वागण्याचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घ्या.

आता ट्रेन्ड 'मंगळसूत्र ब्रेसलेट'चा!

Click Here