गालिचा घरी स्वच्छ कसा करायचा याच्या काही टिप्स पाहुयात.
सणवार आले की ठेवणीतल्या वस्तू आपोआप बाहेर येतात. यातलीच एक गोष्ट म्हणजे गालिचा.
जमिनीवर गालिचा टाकला की घराला एक वेगळाच लूक येतो. परंतु, हा गालिचा साफ करणं तितकंच अवघड आहे.
गालिचा घरी स्वच्छ कसा करायचा याच्या काही टिप्स पाहुयात. ज्यामुळे कितीही वापरुन खराब झालेला गालिचा नवाकोराच वाटेल.
गालिचा धुण्यापूर्वी त्याला झाडूने स्वच्छ साफ करुन घ्या. ज्यामुळे वर लागेली माती निघून जाईल.
जर गालिचावर पाळीव प्राण्यांचे केस किंवा अन्य पदार्थ सांडले असतील तर सेलो टेपच्या सहाय्याने ते स्वच्छ करा.
गालिचावर एखादा डाग पडला असेल तर पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करुन हे पाणी डाग पडलेल्या ठिकाणी लावा. त्यानंतर हलक्या हाताने घासून स्वच्छ करा.
गालिचावर तेलाचे डाग पडले असतील तर त्यावर मीठ टाका. १०-१५ मिनिटांनी हे डाग स्वच्छ करा.