आपल्या जराशा चुकीमुळे संपूर्ण सिल्कचं कापड खराब होऊ शकतं.
प्रत्येक स्त्रिच्या कपाटात एक तरी सिल्कची साडी नक्कीच असते. परंतु, हे सिल्कचं कापड धुतांना मात्र मोठी पंचाईत येते.
सिल्कची साडी किंवा अन्य कपडे धुतांना फार काळजी घ्यावी लागते. कारण, आपल्या जराशा चुकीमुळे संपूर्ण साडी खराब होऊ शकते.
सिल्कच्या कापडाला कधीही थेट साबण लावू नये. यामुळे कापडाचा रंग खराब होऊ शकतो.
सिल्कची साडी धुण्यासाठी कायम शॅम्पूचा वापर करावा. पाण्यात शॅम्पू मिक्स करुन त्या पाण्यात साडी भिजवून ठेवावी.
साडी धुतल्यावर तिला थेट उन्हात वाळवू नका. त्याऐवजी सावलीत वाळवा.