सफरचंदावरील वॅक्स 'या' पद्धतीने करा दूर

फळांची चकाकी वाढवण्यासाठी त्याच्यावर अनेकदा वॅक्स लावलं जातं. 

सध्या बाजारात प्रत्येक पदार्थांमध्ये भेसळ केल्याचं पाहायला मिळतं. अगदी फळे, भाज्या यांचे रंग, आकार सुद्धा केमिकल्समुळे बदलले जातात.

फळांची चकाकी वाढवण्यासाठी त्याच्यावर अनेकदा वॅक्स लावलं जातं. खासकरुन सफरचंदावर हे  सिंथेटीक वॅक्स आवर्जुन पाहायला मिळतं.

सफरचंदावर लावलेलं वॅक्स कशाप्रकारे स्वच्छ करावं याविषयी काही टीप्स पाहुयात.

सफरचंद खाण्यापूर्वी त्याला ५ मिनिटे कोमट पाण्यात भिजवून ठेवा.

पाण्यामध्ये व्हिनेगर मिक्स करुन या पाण्याने सफरचंद स्वच्छ चोळून धुवावं.

पाण्यात बेकिंग सोडा टाकून या पाण्यात सफरचंद ३-४ मिनिटे बूडवून ठेवावेत.

शेंगदाणा की मोहरीचं तेल?; शरीरासाठी कोणतं तेल आहे गुणकारी

Click Here