अयोध्येतील राम मंदिरात कोट्यवधी भाविकांनी राम दर्शन घेतले आहेत.
२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भव्य राम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर आतापर्यंत अवघ्या दीड वर्षांत तब्बल ५.५ कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतल्याचे म्हटले जात आहे.
यामध्ये आतापर्यंत सुमारे साडेचार लाख व्हीआयपी अयोध्येत पोहोचले आहेत आणि त्यांनी रामललाचे दर्शन घेतले आहे.
केंद्रीय मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी रामललाचे दर्शन घेतले. चित्रपट, व्यवसाय, क्रीडा जगतातील सेलिब्रिटी यांनी अयोध्येत जाऊन रामदर्शन घेतले.
देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री अयोध्येत आले. काही राज्यपालांनी दोनदा येऊन कुटुंबियांसोबत दर्शन घेतले आहे.
क्रीडा जगतातील भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यापासून ते विराट कोहलीपर्यंत अनेक जण रामचरणी नतमस्तक झाले.
तर बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्यापासून ते गोविंदा यांच्यापर्यंत अनेक जण रामचरणी लीन झाले.
विभागीय आयुक्त गौरव दयाळ म्हणाले की, आतापर्यंत साडेपाच कोटी भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे.
अलीकडेच इलॉन मस्क यांचे वडील अयोध्येत आले होते. भारतीय पोशाखात त्यांनी रामललाचे दर्शन घेतले.
आता श्रीरामांचा दरबारही भाविकांसाठी खुला झाला असून, अजूनही दररोज हजारो भाविक अयोध्येत जाऊन रामदर्शनाने तृप्त होत आहेत.