विचार, संस्कृतीचे जतन करण्यासाठी मानवाने शाेध लावला, ताे लेखनाचा. हजाराे वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास आजही सुरूच आहे.
मानवी ज्ञान आणि संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवण्यासाठी, लेखन ही सर्वात मोठी क्रांती ठरली.
आजपासून सुमारे ५,५०० वर्षांपूर्वी मेसोपोटामियामध्ये, सुमेरियन लोकांनी 'क्युनिफॉर्म' लिपीचा पाया रचला.
मातीच्या ओल्या टॅब्लेटवर कोरलेली ही लिपी, जगातील पहिली 'लिखित भाषा' ठरली. तिथून लिखित भाषेचा प्रवास सुरू झाला.
सुरुवातीला चित्रांनी सुरू झालेला हा प्रवास, हळूहळू प्रत्येक चिन्हाला एक विशिष्ट अर्थ देऊन परिपूर्ण झाला. या भाषेमुळे भावना, विचार व्यक्त झाले.
इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीने 'हायरोब्लिफ्स' ही सुंदर लेखनशैली निर्माण केली. मंदिरे, स्मारके आणि पॅपिरसच्या कागदावर कोरलेली ही लिपी.
चीनमध्ये 'ओरॅकल बोन्स'वर लिहिलेली प्राचीन लिपी, आजही चिनी भाषेचा पाया आहे.
सिंधू संस्कृतीची रहस्यमय लिपी आजही आपल्याला तिच्या इतिहासाची उकल करण्याची वाट दाखवत आहे.
फिनिशियन लोकांनी २०-२२ चिन्हे वापरून जगाला पहिला 'अल्फाबेट' दिला. या साध्या पण प्रभावी लिपीने लेखन अधिक सोपे केले.
फिनिशियन लिपीमध्ये स्वर जोडून ग्रीकांनी यातूनच विकसित लॅटिन लिपी विकसित केली. आज जगातील अनेक भाषांमध्ये वापरली जाते.
मातीच्या टॅब्लेटपासून डिजिटल माध्यमांपर्यंत, लेखनाने हजारो वर्षांचा प्रवास केला आहे.