घरात 'ही' राेपं ठेवल्याने हाेताे फायदा!

घरातली राेपं नुसती घराची शोभा वाढवत नाहीत, तर उर्जा देतात. मन प्रसन्न करतात आणि तुमच नशीबही उजळवतात. 

घरात तुळशीच राेप असणं शुभ मानलं जात. तुळशीमुळे वायूशुद्धी हाेते, मानसिक शांतता मिळते. नकारात्मक उर्जा कमी हाेतात. 

मनी प्लांट हे समृद्धीचं प्रतिक मानलं जात. फेंग शुईनुसार घराच्या आग्नेय दिशेला मनी प्लांट ठेवल्याने घरात प्रेम वाढते, पैसा टिकताे. 

लवंगाचं झाड हे सुगंधी असतं. वातावरण प्रसन्न राहात. त्यामुळे नकारात्मक उर्जा कमी हाेते. मानसिक आराेग्यासही फादेशीर असते. 

बांबू प्लांट ऑफिसमध्ये ठेवल्याने कामात स्थैर्य मिळते. बांबू प्लांट पाण्यात लावणे अधिक शुभ मानले जाते. बांबू हे टिकाऊ आणि सकारत्मकता आणते. 

कडुलिंब घरात ठेवल्याने वातावरणातील बॅक्टेरिया कमी हाेतात. यामुळे राेगप्रतिकारक शक्ती वाढते. हवेतील शुद्धता वाढते. 

राेज सकाळी झाडांना पाणी घालावे. झाडांशी संवाद साधल्यास ती चांगली वाढतात. आपल्यात सकारात्मकता निर्माण हाेते. 

लहान मुलांचं निसर्गाशी नातं जाेडलं जातं. मुलांना झाडांची निगा राखण्यास सांगितले, त्यातून त्यांचे शिक्षण हाेते. 

Click Here