आपल्या जवळचे नातेवाईक, मित्र - मैत्रिणी यांच्याशी राेज अनेक गाेष्टी शेअर केल्या जातात. पण, 'या' शेअर करत असाल, तर तुमच्या सर्तक राहायला पाहिजे.
प्रत्येकाच्या आयुष्यात नकारात्मक घटना घडत असतात. ठरवलेल्या गाेष्टी वेळेवर हाेत नाहीत, हाती घेतलेल्या कामांमध्ये अपयश येते.
इमाेशनल झाला असाल, तरी तुम्ही तुमच्या आयुष्यातील या गाेष्टी काेणाबराेबरही शेअर करू नका. पुढे जाऊन त्याचा तुम्हाला त्रास हाेऊ शकताे.
स्वतःच यश लाेकांना गाजावाजा करून सांगू नका. काहीजणांना तुमचं यश पाहून त्रास हाेताे, तुमच्या रस्त्यात ते अडथळे निर्माण करू शकतात.
भविष्यातील तुमच्या याेजना आणि त्या याेजना राबवण्यासाठी तुम्ही काय नियाेजन केले आहे, हे तुमच्या पुरते मर्यादित ठेवा.
तुमची मिळकत म्हणजेच इन्कम किती आहे. तुमच्या इन्कमचे साेर्सेस काय आहेत, हे जगजाहीर करणे टाळा.
साेशल मिडीयावर तुमच्या आयुष्यातले खाजगी, आनंदाचे क्षण टाकू नका. तुमची प्रत्येक गाेष्ट साेशल मिडीयावर टाकणे टाळा.
तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल, सुट्टीसाठी जाणार असाल, तर आधीपासून सगळ्यांना ते सांगू नका.
तुमचे प्रेमसंबंध जगजाहीर करण्याआधी नीट विचार करा. काेणाला सांगायचे याचाही विचार करा.