एक महिन्याचे योग चॅलेंज घेणार का?

योगाभ्यासाने शरीर तर लवचिक होतेच, पण वजन कमी होऊन ते नियंत्रणातही राहते, त्यासाठी घ्या हे एक महिन्याचे योगा चॅलेंज. 

पुढे दिलेली सर्व आसने वजन कमी करण्यास मदत करतील, त्यासाठी प्रत्येक स्थितीत २० सेकंद थांबत २-३ राउंड करण्याचा सराव करा. 

 वीरभद्रासन (Warrior Pose): हे आसन पाय, हात आणि कंबर मजबूत करते. चयापचय सुधारते आणि शरीरातील चरबी कमी करते.

 त्रिकोणासन (Triangle Pose): हे आसन कंबर आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. पचनक्रिया सुधारते.

 भुजंगासन (Cobra Pose): हे आसन पोटाचे स्नायू मजबूत करते आणि पोटावरील चरबी कमी करते. पाठीच्या कण्याला लवचिकता येते.

 सेतुबंधासन (Bridge Pose): हे आसन थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते, ज्यामुळे चयापचय सुधारतो आणि फॅट बर्न होते.

 उत्कटासन (Chair Pose): हे आसन पायांचे स्नायू आणि कोर मजबूत करते. यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते.

 फलकासन (Plank Pose): हे आसन पोटाचे स्नायू मजबूत करते आणि शरीरातील चरबी कमी करते.

 वसिष्ठासन (Side Plank Pose): हे आसन बाजूच्या पोटाच्या स्नायूंना मजबूत करते आणि चरबी कमी करते.

 हलासन (Plough Pose): हे आसन पोटाचे स्नायू ताणते आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते.

Click Here