१६ जुलै रोजी कर्क संक्रांती आहे, अर्थात सूर्यदेव कर्क राशीत प्रवेश करत आहेत, त्याचा दुष्परिणाम पुढील राशींना होऊ शकतो.
सूर्य देव हे ग्रहांचे राजा आणि ज्योतिष शास्त्रानुसार ते एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यास एक महिना घेतात, आता ते कर्क राशीत स्थलांतरित होत आहेत.
सूर्यदेव स्थलांतरित होतात तेव्हा त्याचे परिणाम मनुष्य जीवनाबरोबरच संपूर्ण जगावर, निसर्गावरदेखील होतो.
१६ जुलैला सायंकाळी ५.१७ मिनिटांनी सूर्य मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. कर्क राशीचे स्वामी चंद्रदेव! सूर्य चंद्राची युती काय परिणाम देणार ते पाहू.
सूर्य चंद्राची युती अशुभ मानली जाते, त्याचे दुष्परिणाम मानव जातीसह अन्य जीवांनाही भोगावे लागतात. पाहूया राशींवर त्यांचा प्रभाव!
मेष : आर्थिक नुकसान, कौटुंबिक वाद तसेच मानसिक अशांतता यामुळे महिनाभर हे लोक तणावाखाली राहू शकतात.
मिथुन : आरोग्याची हेळसांड, पैशांचे नुकसान आणि मानहानीचे प्रसंग या काळात उद्भवू शकतात, त्यामुळे महिनाभर शांत राहण्याचा पवित्रा घ्या.
कन्या : आरोग्याची काळजी घ्या, निदान या महिन्याभरात नवीन कार्याची सुरुवात करू नका तसेच आर्थिक गुंतवणूक पुढे ढकला.
वृश्चिक : अनोळखी लोकांवर विश्वास ठेवून मोठे नुकसान करून घ्याल, त्यामुळे सावध राहा आणि आरोग्याची काळजी घ्या.
-सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.