मायक्रोव्हेवमध्ये ठेऊ नका या गोष्टी, होईल क्षणार्थात स्फोट
मायक्रोव्हेव वापरतांना घ्या काळजी
स्वयंपाक करायचा वेळ आणि त्रास वाचवण्यासाठी आज अनेक घरांमध्ये ओव्हन किंवा मायक्रोव्हेव वापरला जातो.
अवघ्या काही मिनिटांमध्ये पदार्थ तयार करणारा मायक्रोव्हेव वापरतांना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण, आपली एक चूक घरात स्फोट घडवून आणू शकते.
मायक्रोव्हेवमध्ये कधीही स्टील, अॅल्युमिनिअम, लोखंड किंवा अन्य धातूच्या वस्तु ठेऊ नयेत. तसंच फॉईल पेपरही अजिबात ठेऊ नये.
एअरटाइट प्लास्टिक डबा, काच किंवा स्टील कंटेनर मायक्रोव्हेवमध्ये ठेऊ नये यामुळे आतील प्रेशर वाढतं व वस्तूसह मायक्रोव्हेव फुटू शकतो.
उकडलेली अंडी किंवा कवच असलेली अंडी सुद्धा मायक्रोव्हेव मध्ये ठेवू नका. कारण त्यातील ओलावा वाफेत बदलतो आणि दाब निर्माण करतो. अंडी काही सेकंदात स्फोट होऊ शकतेय