आपल्या 4 चुकांमुळे घरात कधीही येऊ शकतो साप, वेळीच द्या लक्ष

साप घरात येण्यामागे अनेक कारणं आहेत. यात काही कारण आपण स्वत:चं तयार केली आहेत.

साप म्हटलं की अनेकांची घाबरगुंडी उडते. यातच जर त्याने घरात शिरकाव केला तर मग काही विचारायलाच नको.

साप घरात येण्यामागे अनेक कारणं आहेत. यात काही कारण आपण स्वत:चं तयार केली आहेत.

घरात जाई, चमेली, केशर,पारिजातक अशी सुगंधित फुलझाडे असतील तर या फुलांच्या सुगंधामुळे साप आकर्षित होतो.

घराजवळ कुजलेला कचरा असेल तर त्याठिकाणी उंदीर आणि अन्य जीव येतात. या जीवांना खाण्यासाठी साप येऊ शकतो.

घराच्या गार्डनमध्ये लहान पाण्याचे तलाव असतील तर तिथे बेडूक वगैरे येऊ शकतात. ज्यामुळे साप सहाजिकच त्याठिकाणी पोहचू शकतो.

दाट गवत आणि वेलींमध्ये साप थंडावा शोधायचा प्रयत्न करत असतो.त्यामुळे तुमच्या घराजवळ अशा वेली असतील तर त्या लगेच काढा.

रस्त्यात कुत्र्यांनी घेरलं तर घाबरु नका! सुटका करण्यासाठी वापरा ५ ट्रिक्स

Click Here