निसर्ग जेवढा रम्य आहे तेवढाच गूढदेखील आहे. त्याच्या अंतरांगात डोकावून पाहताना अनेकदा चित्तथरारक दृष्य नजरेस पडतात; जशी की ही ७ ठिकाणं!
जपानमधील आओकिगाहारा जंगल: माउंट फुजीच्या पायथ्यावरील घनदाट जंगलात भयाण शांतता असते. तिथे शेकडो आत्महत्यांचे प्रकार घडले आहेत. तिथे दिशादर्शकही काम करत नाही, म्हणून स्थानिक लोक हे ठिकाण टाळतात.
लेक नॅट्रॉन, टांझानिया : "या लालसर सरोवरातील अतिक्षारता इतकी प्रखर आहे की, त्याला स्पर्श करणारी कोणतीही गोष्ट क्षणार्धात दगड बनते; इतकेच नव्हे तर, हवेत उडताना देखील पक्षी मृत्युमुखी पडले आहेत."
माउंट एव्हरेस्ट डेथ झोन : "माउंट एव्हरेस्टवरील ‘डेथ झोन’ (८,००० मीटरवरील उंची) येथे हवेचा दाब इतका कमी असतो की ऑक्सिजन अपुरा पडतो आणि शरीर हवामानाशी जुळवू शकत नाही."
होइया बासिउ फॉरेस्ट, रोमानिया : स्थानिक लोक गायब होणे, इलेक्ट्रॉनिक बिघाड आणि भुतांचे दर्शन असा स्थानिकांचा अनुभव आहे. इतकेच नव्हे तर, झाडंदेखील पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्यासारखी वाकडी पसरली आहेत.
सापांचे बेट, ब्राझील : "हे हजारो गोल्डन लॅन्सहेड सापांचे घर आहे; त्यांनी एक चावा घेतला तर तुम्ही किनाऱ्यावर पोहोचू शकणार नाही."
डेथ व्हॅलीज रेसट्रॅक प्लाया: "वाळवंटात मोठमोठे दगड दिसतात, पण त्यांना हलताना कोणीही पाहिलेले नाही मात्र अमेरिकेतल्या या वाळवंटात तपास करायला जे गेले, ते कधीच परत आले नाहीत.
भानगड किल्ला : "भारतातील सर्वाधिक भयानक ठिकाणाबाबत स्थानिकांचा असा विश्वास आहे की, जो कोणी तिथे रात्रभर थांबतो तो सकाळपर्यंत मृत्यूमुखी पडतो, आणि सरकारही हे मान्य करते."