डास अन् किड्यांना घालवण्यासाठी घराभोवती असाव्यात या वनस्पती 

पावसाळ्यात घरात किंवा बागेत किडे त्रास देत असतील तर लावा ही झाडे.

पावसाळ्यात घरात किंवा बागेत किडे त्रास देत असतील, तर काही सुगंधित वनस्पती लावल्याने हा त्रास नक्कीच कमी होतो. 

या वनस्पतींच्या खास वासामुळे चांगला सुगंध येते, मात्र कीड्यांना हा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे अशा वनस्पती घरात लावल्यास डास, माशी, मुंग्या, आणि अन्य किटक दूर राहतात. 

तुळस : आयुर्वेदिकदृष्ट्या निरोगी आणि घरात मच्छर, माशी दूर ठेवायला उपयोगी.

झेंडू (Marigold) : याची तीव्र गंध अनेक कीटक, डास यांना दूर ठेवतो.

लेमनग्रास : यात 'सिट्रोनेला तेल' असते, जे डास आणि इतर कीटक दूर ठेवते.

शेवंती (Chrysanthemum ) : यात पाइरेथ्रिन्स हे पदार्थ असतात, जे मुंगी, झुरळ, पिसू यांसारख्या कीटकांना दूर ठेवतात.

पुदिना : याच्या वासामुळे मच्छर, मुंग्या, उंदीर यांना घरातून हाकलता येते.

सिट्रोनेला गवत : यात 'सिट्रोनेला ऑईल' असते, जे विशेषतः डास दूर करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

Click Here