आपण फ्रीजमध्ये अनेक गोष्टी ठेवत असतो. मात्र, असे काही पदार्थ आहेत जे चुकूनही फ्रीजमध्ये ठेऊ नयेत.
प्रत्येकाच्या घरात सहज दिसून येणारी वस्तू म्हणजे फ्रीज.
फ्रीजमुळे आज गृहिणींचं जीवन काही अंशी सुखकर झालं आहे.
फ्रीजमध्ये कधीही अंडी ठेवू नयेत. कारण, अंड्यातील ओलावा कमी होऊन ते बेचव होतात.
लोणचं फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नये. कारण, त्यातील तेल, मसाले गोठतात आणि त्याचा परिणाम लोणच्याच्या चवीवर होतो.
कांदा फ्रीजमध्ये ठेवल्यास तो खराब होतो. त्याच्यासोबतच त्याचा उग्रवास अन्य पदार्थांनाही लागतो.
फ्रीजमध्ये लसूण चुकीनही ठेवू नये. यामुळे लसणाला कोंब येण्याची शक्यता असते.
फ्रीजमध्ये ब्रेड कधीच ठेवू नये. यामुळे त्याच्यातील ओलावा कमी होऊन तो लवकर कडक पडतो.