अनेकदा लांबचा प्रवास, धावपळ, मेहनतीची काम केली की शरीर थकून जातं. सहाजिकच शरीर थकलं की मन आणि मेंदूही थकतो. म्हणूनच, शारीरिक थकवा आल्यानंतर कोणते उपाय करायचे ते पाहुयात.
शारीरिक थकवा दूर करण्यासाठी सर्वोत्तम टॉनिक म्हणजे नारळ पाणी. नारळाच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात मिनरल्स असतात. ज्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढण्यास मदत होते.
सकाळी उठल्यावर जर एक कप भाज्यांचा रस प्यायला तर दिवसभर एनर्जी टिकून राहते. यात शक्यतो पालक,पुदिना यांसारख्या हिरव्या भाज्यांचा रस प्यावा.
आवळा, बेरीज, संत्री यांसारख्या फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटामिन, मिनरल्स असतात. ज्यामुळे शरीरात एनर्जी निर्माण होते.
थकवा दूर करण्यासाठी लिंबू सरबत बेस्ट ऑप्शन आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅन्टीऑक्सिडेंट्स असल्याने तरतरी येते.
जपा हृदयाचं आरोग्य, ही लक्षण दर्शवतात नसांमधील ब्लॉकेज!