वॅक्सिंग किंवा रेझरशिवाय रिमूव्ह करा फेशियल हेअर 

फेशिअल हेअरमुळे अनेकदा केलेला मेकअप चेहऱ्यावर सेट होत नाही. 

सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे अनेक स्त्रिया ब्युटीपार्लर, सॅलॉनमध्ये जाऊन त्यांच्या लूकमध्ये मनासारखे बदल करत असतात.

अनेकांच्या चेहऱ्यावर बारीक लव म्हणजेच लहान केस असतात. यालाच आपण फेशिअल हेअर असंही म्हणतो.

फेशिअल हेअरमुळे अनेकदा केलेला मेकअप चेहऱ्यावर सेट होत नाही. तसंच हे केस सौंदर्यातही बाधा आणतात. म्हणूनच, घरच्या घरी हे हेअर कसे रिमुव्ह करायचे ते पाहुयात.

फेशिअल हेअर रिमुव्ह करण्यासाठी हळदीचा फेसपॅक उत्तम पर्याय आहे.

हळदीचा फेसपॅक तयार करण्यासाठी तांदळाचं पीठ, मध, दूध आणि हळद हे घटक एकत्र मिक्स करा.

तयार फेसपॅकची जाडसर पेस्ट तयार झाल्यावर ती चेहरा आणि मानेभोवती लावा.

१५ ते २० मिनिटांनंतर हा पॅक वाळल्यानंतर तो केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने हलक्या हाताने तो रगडून काढा. यामुळे चेहऱ्यावरील केस नक्कीच कमी होतील.

डार्क सर्कल कमी करणारे घरगुती उपाय

Click Here