तुम्हाला माहीत आहे का, 'हे' पदार्थ खाल्ल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण संतुलित राहते!
लोह आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे. संतुलित आहार अशक्तपणा रोखण्यास मदत करू शकतो.
भाज्या आहेत लोहाचे स्रोतः पालक, ब्रोकोली आणि बीट सारख्या भाज्यांमध्ये भरपूर लोह असते.
फळांमध्ये लोहः डाळिंब, सफरचंद आणि खजूर हे लोहाचे चांगले स्रोत आहेत.
डाळी आणि शेंगाः मसूर, राजमा आणि हरभरा यामध्ये भरपूर लोह असते.
धान्यांमध्ये लोहः बाजरी, क्विनोआ आणि ओट्स हे लोहाचे समृद्ध स्रोत आहेत.
सुकामेवा आणि बियाः भोपळ्याच्या बिया, तीळ आणि बदामांमध्येही लोह असते.
संत्री, किवी आणि लिंबू यांसारखे व्हिटॅमिन सी समृद्ध फळे लोह शोषण्यास मदत करतात.