घर खरेदीवेळी 6 चुका टाळा, अन्यथा होईल पश्चात्ताप

चूक झाली, तर रेरा कायदादेखील तुमची काहीही मदत करू शकणार नाही.

घर खरेदी करताना काही चुका केल्यास रेरा (रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अॅक्ट) कायदादेखील तुमची काहीही मदत करू शकत नाही.

एकतर्फी अटींवर स्वाक्षरी : बिल्डर करारात अशा अटी घालतात ज्यामुळे त्यांना प्रकल्प रद्द करण्याचा वा डिझाइन बदलण्याचा अधिकार मिळतो. अशा अटींवर स्वाक्षरी करणे टाळा.

बुकिंगवेळी रोख व्यवहार : स्टॅम्प ड्युटी वाचविण्यासाठी बुकिंगवेळी रोकड दिली जाते. हे व्यवहार कायद्यास मान्य नसतात.

वेळेवर पेमेंट न करणे : हप्ता वेळेवर न भरल्यास तुम्हाला बिल्डरवर विलंबाचा आरोप करता येत नाही.

पजेशनसाठी विलंब : बिल्डरने दिलेल्या नवीन पजेशनच्या तारखेला मान्यता दिल्यास, दावा कमजोर पडतो. नवीन तारीख स्वीकारण्यापूर्वी सल्ला घ्या.

तक्रार करण्यास विलंब : तक्रार दाखल करण्यास ठरावीक वेळ मर्यादा नसते; परंतु, उशीर झाल्यास तुमची याचिका फेटाळली जाऊ शकते.

भ्रामक योजनांवर विश्वास : बिल्डर ग्राहकांना प्री-ईएमआय वा भाडे परतावा योजनांचे आश्वासन देतात. कायदा अशा योजनांना मान्यता देत नाही. त्यामुळे, अशा योजनांवर विश्वास ठेवू नका.

Click Here