विविध गुणधर्म असलेली तुळस हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानली जाते.
तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीच्या पूजेने सुख-समृद्धी येते. तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मी वास करते, असे म्हणतात.
वास्तुशास्त्रानुसार, तुळशीजवळ ५ वस्तू कधीही ठेऊ नये, अन्यथा प्रतिकूल प्रभाव घरात येणाऱ्या संपत्तीवर पडू शकतो.
तुळशीजवळ बूट, चप्पल कधीही ठेवू नये. याने तुळशीचा तसेच माता लक्ष्मीचा अपमान होतो. या एका चुकीमुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.
श्रीविष्णूला तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशीचे नियमित पूजन फलदायी आहे. तुळशीजवळ झाडू ठेवू नये, असे म्हणतात. याने लक्ष्मी-नारायणाचा अपमान होऊ शकतो.
तुळशीजवळ किंवा तुळशीशेजारी शिवलिंग ठेवू नये, असे मानले जाते. याची पौराणिक कथा प्रसिद्ध आहे.
तुळशीजवळ गुलाब आणि निवडुंगसारखी काटेरी झाडे कधीही ठेवू नयेत. असे केल्याने प्रतिकूल फळ मिळते, अशी मान्यता आहे.
तुळशीचे रोप अतिशय पवित्र आहे, त्यामुळे त्याच्या सभोवतालच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. तुळशीच्या भांड्याजवळ कधीही कचरापेटी ठेवू नये.
वास्तुशास्त्रात तुळशीबाबत अनेकविध प्रकारची माहिती देण्यात आली आहे. याबाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल.