मूळव्याध होण्यासाठी एक नाही तर अनेक गोष्टी कारणीभूत असतात.
दैनंदिन जीवनात आपल्याकडून अशा अनेक गोष्टी घडत असतात. ज्यामुळे नकळतपणे शारीरिक व्याधींनी निमंत्रण मिळत असतं.
मूळव्याध होण्यासाठी एक नाही तर अनेक गोष्टी कारणीभूत असतात. म्हणूनच, आपल्या कोणत्या चुकांमुळे मूळव्याधीची समस्या उद्भवू शकते ते पाहुयात.
बैठी कामे करणे, शौचास जोर लावणे, जास्त वजन उचलणे यांसारख्या सवयींमुळे मूळव्याध बळावू शकतो.
मूळव्याध टाळायचा असेल तर आहारात पालेभाज्या, फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे.
अतिप्रमाणात चहा, कॉफीचं सेवन केल्यामुळेही मूळव्याध होतो.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणं हे सुद्धा मूळव्याध होण्यामागचं एक कारण आहे. शरीरात पाणी कमी पडल्यामुळे बद्धकोष्ठता होते. परिणामी, मूळव्याध होऊ शकतो.
तेलकट आणि तळलेले पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात करणे यामुळे सुद्धा मूळव्याध होतो.