हिवाळ्यात जपा मुलांचं आरोग्य
हिवामान बदललं की त्याचा पहिला परिणाम हा मुलांच्या आरोग्यावर होतो.
हिवाळ्यात मुलांना सर्दी,खोकला हमखास होतो. म्हणूनच, त्यांच्या आहारात हेल्दी ड्रिंक्सचा समावेश करा.
हिवाळ्यात मुलांना आवर्जुन खजूर आणि बदाम घातलेलं दूध प्यायला द्या.
हळद-केसर दूध सुद्धा सुपरफूडसारखं काम करतं. हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे मुलांना हे दूध नक्की द्या.
मसाला दूध लहान-मोठ्या सगळ्यांनाच आवडतं. हे दूध चवीला जितकं रुचकर लागतं तितकंच ते पोषकही आहे. त्यामुळे मुलांना मसाला दूध नक्की द्या.