हेल्दी वाटणारे 'हे' 3 पदार्थ प्रत्यक्षात आहेत शरीरासाठी त्रासदायक

अनेक जण फिट राहण्यासाठी भाज्या, फळे वा अन्य हेल्दी पदार्थांचं सेवन करत असतात.

सध्याच्या काळात प्रत्येक जण त्यांच्या आरोग्याकडे जातीने लक्ष देतांना दिसत आहे.

अनेक जण फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या भाज्या, फळे वा अन्य हेल्दी पदार्थांचं सेवन करत असतात.

असे काही पदार्थ आहेत जे हेल्दी म्हणून प्रत्येक जण खातो. मात्र, त्याचा अतिरेक झाला तर ते पदार्थ शरीरासाठी घातक ठरतात.

टी बॅग्स - सध्या अनेक जण टी बॅग्सचा वापर करतांना सर्रास दिसतात. परंतु, या बॅग्स नायलॉन, थर्मोप्लास्टिक, रेयॉन यांपासून तयार केल्या जातात. जे शरीरासाठी घातक आहे.

तुम्ही टी बॅग्समधील ग्रीन टी ऐवजी बाजारात मिळणारा मोकळ्या पानांचा ग्रीन टी नक्कीच पिऊ शकता.

अनेक जण आपल्या लहान मुलांना वा वयोवृद्धांना फळांचा रस देतात. परंतु, रस देतांना त्यातील फायबरचं प्रमाण कमी आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे स्ट्रोकचा धोका असतो.

जर तुम्ही डाएट करत असाल किंवा हाय ब्लडप्रेशर, हृदयरोग असेल तर चीजचं सेवन योग्य प्रमाणात करा. 

अभिनेत्री रुचिरा जाधवची धाकटी बहिणही आहे तिच्या इतकीच सुंदर

Click Here