अंधारात अक्षर चमकताना पाहिली का?

अंधारात पुस्तक उघडलं आणि अक्षर चमकायला लागली, तर ही जादू आहे असं वाटेल ना? पण प्राचीन काळातील हे आश्चर्यकारक सत्य आहे.

प्राचीन ग्रीस, रोम, चीन आणि भारतात अशा हस्तलिखितांचा उल्लेख मिळतो, जी अंधारात प्रकाश देत होती.

प्राचीन हस्तलिखितांत जी शाई वापरली जायची. त्यात नैसर्गिक फॉस्फरसयुक्त किंवा खनिज घटक असणारी शाई वापरायचे. 

फॉस्फरस, कॅल्शियम सल्फाइड किंवा विशिष्ट झाडांच्या राळी यांचा वापर करून अशी शाई तयार केली गेली असावी, असा अंदाज आहे. 

ग्रीक अल्केमिस्ट त्यांच्या प्रयोगांची नोंद चमकत्या शाईत करत. चीनमध्ये Glow-in-the-dark manuscripts चा उल्लेख आहे. 

रात्री दिवा न लावता वाचन करता यावं, गुप्त संदेश लपवण्यासाठी, धार्मिक ग्रंथांना दैवी प्रकाश मिळाल्याची भावना निर्माण करण्यासाठी शाईचा वापर केला जायचा. 

आजपर्यंत फार कमी स्वयंप्रकाशी हस्तलिखितं सापडली आहेत. शाईचं नेमकं मिश्रण पूर्णपणे उलगडलं नाही.

आज आपण फ्लुरोसेंट इंक किंवा ग्लो-इन-द-डार्क पेंट वापरतो. पण ही कल्पना हजारो वर्षांपूर्वीच अस्तित्वात होती. 

स्वयंप्रकाशी अक्षरं म्हणजे फक्त शास्त्र नव्हे, तर त्या काळातील लोकांच्या कल्पकतेचं द्योतक आहे.

Click Here