देशातील 'या' ट्रेनमधून फिरा विदाऊट तिकीट!

पब्लिक ट्रान्सपोर्टने कुठेही प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तिकीट काढणं अनिवार्य आहे. 

पब्लिक ट्रान्सपोर्टने कुठेही प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तिकीट काढणं अनिवार्य आहे. त्यामुळे तिकीटाशिवाय तुम्ही देशभरात वा जगभरात कुठेही प्रवास करु शकत नाही.

रेल्वेने प्रवास करायचा म्हटलं तर आपल्याला ठराविक स्टेशनचं तिकीट काढावं लागतं. परंतु, देशात अशी एक रेल्वे आहे जी विदाऊट तिकीट प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसरीकडे नेते.

मागील ७५ वर्षापासून ही रेल्वे फुकटात प्रवाशांचा प्रवास घडवून आणत आहे. ही रेल्वे १९४८ पासून प्रवाशांना मोफत प्रवास देत आहे. विशेष म्हणजे जाणीवपूर्वक घडवून आणलेला हा निर्णय आहे.

भाक्रा नांगल धरणाविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. स्वातंत्र्यानंतर या धरणाचं काम सुरु झालं त्यावेळी येथील कामगार, अभियंते आणि अवजड यंत्रसामग्री नेण्यासाठी या विशेष रेल्वेची निर्मिती करण्यात आली होती.

धरणाचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत या रेल्वेचा वापर करण्यात आला. मात्र, ही रेल्वे तेथील लोकांना इतकी आपलीशी झाली होती की भाक्रा बियास मॅनेजमेंट बोर्डाने (BBMB)  ती तशीच सुरु ठेवायचा निर्णय घेतला.

भाक्रा धरण परिसरातील पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने ही रेल्वे सुरु ठेवण्यात आली.विशेष म्हणजे आजही ही ट्रेन विनामूल्य चालवली जाते. 

 या रेल्वेचा संपूर्ण खर्च भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ स्वतः उचलते. या रेल्वेचा सर्वाधिक फायदा बीबीएमबी कर्मचारी, शाळकरी आणि महाविद्यालयीन मुले, तसंच अन्य गावकऱ्यांना होतो.

कंबरेचा घेर कमी करण्यासाठी ट्राय करा हे सोपं डाएट

Click Here