एका प्रसिद्ध देशातील 'या' शहरात मांजरींची संख्या माणसांपेक्षा जास्त आहे.
अशी एक जागा आहे, जिथे मांजरींची संख्या माणसांपेक्षाही जास्त आहे.
या ठिकाणाचे नाव ताशिरोजिमा आहे, जे मांजरीचे बेट म्हणून देखील ओळखले जाते.
ताशिरोजिमा हे जपानमधील एक बेट आहे, जिथे मांजरींची संख्या माणसांपेक्षा जास्त आहे.
या ठिकाणी इतक्या मांजरी आहेत की, ते पर्यटकांसाठी एक खास आकर्षण केंद्र बनले आहे.
स्थानिक लोक या मांजरींना भाग्यवान मानतात आणि त्यांची काळजी घेतात.
या बेटावर मांजरींना समर्पित एक मंदिर देखील आहे, जे या जागेला खास बनवते.
ताशिरोजिमा हे एक लहान गाव आहे, जिथे सुमारे ५०-६० लोक राहतात, तर मांजरींची संख्या शेकडोंमध्ये आहे.
ताशिरोजिमा येथील मांजरी जंगली नाहीत, पण त्या पूर्णपणे पाळीव देखील नाहीत.
त्यांना "सेमी-फेरल" म्हणतात, म्हणजे त्या माणसांसोबत राहतात, पण मुक्तपणे फिरतात.