भारताच्या आर्थिक राजधानीत भीक मागून हा व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंत भिकारी बनला
भिकारी हा शब्द उच्चारला तर आपल्या डोळ्यासमोर फाटके कपडे, विखुरलेले केस, ना राहण्यासाठी घर, ना जेवण असं चित्र उभे राहते
मात्र मुंबईतील एक भिकारी चक्क कोट्यवधीचा मालक आहे. तो ना केवळ भारतात तर या जगातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्यापैकी एक आहे
आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडलेला भरत जैन मुंबईच्या रस्त्यावर भीक मागण्याचं काम करतो. त्याची संपत्ती ७.५ कोटी इतकी आहे
भीक मागून भरत जैन महिन्याला ६० हजार ते ७५ हजार इतकी कमाई करतो. भरत स्वत: भीक मागत असला तरी त्याने दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले आहे
भरत जैनकडे मुंबईत १.४ कोटींचे २ फ्लॅट आहेत. ठाण्यात दुकानात गुंतवणूक आहे. त्यातून त्याला महिन्याला ३० हजार भाडे मिळते
मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आझाद मैदान याठिकाणी भरत जैन भीक मागताना दिसून येतो.
इतकेच नाही तर भरत जैन याला अनेक भाषा येतात, त्यात हिंदी, मराठी, गुजराती आणि इंग्रजीचा समावेश आहे