हा कुल्फी शब्द आला तरी कुठून?

कुल्फी शब्द ऐकला की कसं मस्त थंडगार वाटतं ना... मलई कुल्फीपासून अनेक फ्लेवर्समध्ये कुल्फी मिळते. कुल्फी म्हटल्यावर अनेक आठवणींना उजाळा मिळताे. 

कुल्फी आता सहज मराठीमध्ये रूळलेला शब्द खरा कुठच्या भाषेतून आला आहे, याची तुम्हाला माहिती आहे का?

कुल्फी हा शब्द फारसी भाषेतून आला आहे. कुल्फी या शब्दाचा अर्थ माेल्डमध्ये घट्ट गाेठवलेली वस्तू असा हाेताे. 

मुघल सम्राटांनी पहिल्यांदा कुल्फी केल्याच्या इतिहासात नाेंद आहे. १६ व्या शतकात कुल्फी केल्याचा उल्लेख आढळताे. 

दूध आटवून घट्ट करून त्यात सुकामेवा, केशर घालून माेल्डमध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवल्यास घरच्या घरीही कुल्फी तयार हाेते. 

मलई, पिस्ता, बदाम, गुलाब, केशर असे नैसर्गिक फ्लेवर्स आधी कुल्फीमध्ये उपलब्ध हाेते. आता मॅंगाे, चिकू, चाॅकलेट असे फ्लेवर्सही मिळतात.

कुल्फी सगळ्यांनाच आवडते. गाडीवर कुल्फी विकणाऱ्या कुल्फीवाल्यांची घंटा ऐकल्यावर सगळ्यांना कुल्फी खाण्याची इच्छा हाेते. 

कुल्फीला फक्त भारतातच नाही तर पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, लंडन आणि अमेरिकेतही डेझर्ट म्हणून पसंती मिळते. 

Click Here