राेजच्या वापरातली पेन, पेन्सिल नक्की आली तरी कुठून? या गाेष्टींचा इतिहास किती जुना आहे? या विषयी तुम्हाला माहिती आहे का?
लिखाणाचा इतिहास हा खूप जुना आहे. मानव गुहेत राहायचा, त्यावेळी भित्तीचित्र काढून संदेश द्यायचा. हाच इतिहासातील लिखाणाच पहिला टप्पा आहे.
प्राचीन इजिप्तमध्ये लाेकं पक्ष्यांच्या पिसांचा (Quill Pens) वापर करून लिखाण करायचे. पिसं शाईमध्ये बुडवून लिहायचे.
राेमन लाेक धातूच्या टाेकाचा वापर करून लिहायला सुरूवात केली. त्याकाळी ते मेणाच्या पट्ट्यांवर लिहायचे.
Lewis Waterman या व्यक्तीने १८८४ साली फाऊंटन पेन तयार केले. आज आपण वापरत असलेल्या पेनाचा पाया आहे.
Laszlo Biro या हंगेरीयन पत्रकाराने १९३८ मध्ये बाॅलपाॅईंट पेन तयार केले. याला खूप लाेकप्रियता मिळाली.
आजही बाॅलपाॅईंट पेनला जास्त पसंती मिळते. आजच्या काळातही हे पेन टिकून आहे. माेठ्या प्रमाणात जगभरात हे पेन वापरले जाते.
पेन्सिलचा इतिहास ही खूप जुना आहे. पेन्सिलचा पहिला वापर हा इंग्लडमध्ये करण्यात आला हाेता.
१५६४ साली इंग्लडमध्ये ग्रेफाइटचा माेठा साठा सापडला हाेता. त्याचा वापर करून पहिल्या पेन्सिल्स बनवण्यात आल्या हाेत्या.