प्रत्येक घरात हिंगाशिवाय फाेडणी हाेतच नाही. राेजच्या वापरातल हिंग कुठून आलं? कसं तयार हाेतं हे माहिती आहे का?
हिंग हा झाडापासून मिळणाऱ्या एका गाेंदासारख्या पदार्थापासून तयार केला जाताे.
अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान या देशात मिळणाऱ्या फेरूला असाफेटिडा या वनस्पतीच्या मुळांपासून हिंग तयार केला जाताे.
झाडाच्या मुळाला कट दिल्यावर त्यातून गाेंदासारखा पांढरट, पिवळसर पदार्थ बाहेर येताे. हाच पदार्थ म्हणजे हिंग.
सल्फरयुक्त संयुगांमुळे गाेंदाला तीव्र वास असताे. पण, याच वासामुळे भाजीला खमंगपणा येताे.
मुळामधून आलेला राळ वाळवून त्याचे छाेटे तुकडे करतात. त्याची पावडर करून गव्हाचे पीठ, शेंगदाण्याचे पीठ इ. मिश्रणात मिसळून साठवण योग्य बनवतात.
फेरुला झाड नैसर्गिकरित्या भारतात उगवत नाही. पण, आता हिमाचलमध्ये लागवड सुरू केली आहे. यामुळे हिंगासाठी अफगाणिस्तान, इराणवर अवलंबून हाेताे.
हिंगामुळे पचनशक्ती वाढते, गॅस, अपचनावर गुणकारी आहे. सर्दी - खाेकल्यावरही हिंग उपयुक्त असताे.
राेजच्या वापरातला हिंग या पद्धतीने आपल्या स्वयंपाकघरात पाेहचताे. आणि आपल्या जेवणाची चव वाढवताे.