गेटवे ऑफ इंडिया मुंबईतील पर्यटन स्थळापैकी एक. गेटवे ऑफ इंडियाला असणारा १०१ वर्षांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?
गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. मुंबईतील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ आहे.
गेटवे ऑफ इंडियाला भारताचे प्रवेशद्वार असेही म्हटले जाते. समुद्रापाशी गेली १०१ वर्षे दिमाखात उभे आहे.
पाचवा किंग जाॅर्ज आणि क्वीन मेरी हे भारतात आले हाेते. याच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आले आहे.
१९११ साली गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी करण्यात आली हाेती. १९१४ साली जाॅर्ज विटेट यांनी गेटवे ऑफ इंडियाचे फायनल डिझाइन तयार केले.
पुढच्या १० वर्षांत गेटवे ऑफ इंडिया बांधून तयार झाले. १९२४ साली गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम पूर्ण झाले हाेते.
गेटवे ऑफ इंडियाची उंची जवळपास ८५ फूट असून बेसाल्ट दगडांपासून हे बांधण्यात आले आहे.
समुद्रामार्गे भारतात येणाऱ्या लाेकांचे स्वागत करण्यासाठी गेटवे ऑफ इंडियाची बांधणी करण्यात आली हाेती.
गेटवे ऑफ इंडिया मुंबईची ढाल बनून आजही उभे आहे. उनं - पाऊस, समुद्राच्या लाटा झेलत आजही गेटवे ऑफ इंडिया जसच्या तसं उभ आहे.
विविध प्रकारच्या लाईट्समुळे रात्रीच्या अंधारात गेटवे ऑफ इंडियाचे साैंदर्य अजून खुलून दिसते.