आजही FM ची इतकी क्रेझ का ?

आजकाल हातातल्या माेबाईलवर युट्यूब, स्पोटिफाय, गाना यांसारखे app एका क्लिकवर उपलब्ध असूनही लोक आजही FM ऐकतात; कारण... जाणून घेऊया 'एफएम'चा इतिहास. 

'आप सुन रहे है', आठवतंय का हे वाक्य?  एकेकाळी प्रत्येक घरात रेडिओ असायचा. घरात आई काम करताना, तुम्ही अभ्यास करताना मागे एफएम सुरू असायचं. 

FM म्हणजे Frequency Modulation. रेडिओ प्रसारणाचा हा एक प्रकार आहे. एफएममुळे आवाज स्पष्ट येताे, आवाजाचा दर्जा सुधारताे. 

एफएमच्या आधी AM म्हणजे  Amplitude Modulation चा वापर केला जायचा. १९०० च्या काळाय एएमचा शाेध लागला. 

अमेरिकेतील Edwin Armstrong यांनी १९३३ मध्ये FM तंत्रज्ञानाचा शोध लावला. या शाेधामुळे प्रसारण क्षेत्रात माेठा बदल झाला. 

एफएमचा शाेध लागल्यानंतर ६ वर्षांनंतर म्हणजे १९३९ साली अमेरिकेत एफएमच पहिलं प्रसारण झाल. 

भारतात मद्रास (चेन्नई) येथे १९७७ साली पहिलं एफएम प्रसारण झालं. ऑल इंडिया रेडिओने याची सुरूवात केली. 

सुरूवातीला फक्त सरकारी वापरासाठी एफएमचा वापर केला जात हाेता. ९० च्या दशकात एफएम माेठ्या प्रमाणावर लाेकांपर्यंत पाेहचलं. 

ऑल इंडिया रेडिओने १९९३ साली एफएम गाेल्ड या चॅनलची सुरूवात केली. हे पहिलं एफएम चॅनल. 

२००१ सालापासून खासगी एफएम स्टेशन्सना परवानगी मिळाली. त्यानंतर रेडिओचा चेहराच बदलला. 

गेल्या २४ वर्षांत भारतात ३७० हूनअधिक एफएम स्टेशन्स आहेत. एफएम चॅनल्स म्हणजे लाेकांना स्वतः आवाज वाटताे.

सध्या माेबाईलवर अनेक अँप असली तर, अजूनही एफएम चॅनल्स आपले वेगळेपण आणि क्रेझ टिकवून आहेत. 

Click Here