जगातील असे ७ सर्वात लहान देश, ज्यांचे क्षेत्रफळ एका गावापेक्षा कमी आहे.
जगातील काही देश इतके लहान आहेत की, त्यांचे क्षेत्रफळ एखाद्या गावापेक्षा किंवा परिसरापेक्षा कमी आहे.
युरोपमधील रोम, इटली येथे स्थित व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. त्याचे क्षेत्रफळ फक्त ०.४४ चौरस किमी आहे.
युरोपमध्ये फ्रेंच सीमेजवळ स्थित मोनॅकोचे क्षेत्रफळ २.०२ चौरस किमी आहे. हा देश कॅसिनो आणि ग्रँड प्रिक्ससाठी प्रसिद्ध आहे.
पॅसिफिक महासागरात स्थित नाउरूचे क्षेत्रफळ २१ चौरस किमी आहे. हा जगातील सर्वात लहान स्वतंत्र प्रजासत्ताक देश आहे, ज्याला राजधानी नाही.
पॅसिफिक महासागरात वसलेले, तुवालूचे क्षेत्रफळ २६ चौरस किमी आहे. हा देश त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो.
इटलीने वेढलेले सॅन मारिनोचे क्षेत्रफळ ६१ चौरस किमी आहे आणि लोकसंख्या सुमारे ३३,००० आहे. हे युरोपमधील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र आहे.
स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया यांच्यामध्ये वसलेले लिकटेंस्टाईनचे क्षेत्रफळ १६० चौरस किमी आहे. लिकटेंस्टाईन त्याच्या पर्यटन स्थळांसाठी खूप प्रसिद्ध आहे.
पॅसिफिक महासागरात स्थित मार्शल बेटे १८१ चौरस किमी क्षेत्रफळाची आहेत. ती त्ंयाच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जातात.
उत्तर समुद्रात स्थित सीलँड हा एक अपरिचित सूक्ष्म राष्ट्र आहे, ज्याचे क्षेत्रफळ फक्त ०.००४ चौरस किमी आहे.