जुईला लग्नासाठी हवाय असा मुलगा! 

जुईने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला लग्नासाठी कसा मुलगा हवाय, याचा खुलासा केला आहे. 

'पुढचं पाऊल' मालिकेतून सोशिक सून बनून घराघरात पोहोचलेली जुई 'ठरलं तर मग' मालिकेत स्मार्ट, हुशार आणि प्रेमळ सूनेची भूमिका साकारत आहे.

जुईने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला लग्नासाठी कसा मुलगा हवाय, याचा खुलासा केला आहे. 

"मला सपोर्ट करणारा, सांभाळून घेणारा मुलगा हवाय", असं जुई म्हणाली. 

जुईला लग्नासाठी मागणी येत असल्याचा खुलासाही तिने केला. "माझ्या मेल बॉक्समध्ये, इन्स्टाच्या DM मध्ये लोक मेसेज करतात". 

"माझ्या कर्जतच्या घरी मुलांचे वडील त्यांच्या पत्रिका आणि बायोडेटा पाठवतात", असंही जुई म्हणाली. 

जुईने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'पुढचं पाऊल', 'सरस्वती' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 

सध्या ती साकारत असलेल्या सायलीच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

Click Here