येत्या काळात सोलो आणि बजेट फ्रेंडली ट्रिपचा विचार करत असाल, तर भारतातील १० हिल स्टेशन तुमच्या बकेट लिस्टमध्ये आजच ऍड करा!
पावसाळी वातावरण होऊ लागले की आपसुख आपले मन निसर्गाकडे झेपावते आणि खिशाला परवडेल अशी सहल आपल्याला हवी असते, त्यासाठी हे पर्याय!
मसुरी, उत्तराखंड : हिल स्टेशनच्या यादीत अतिशय आकर्षक असे हे ठिकाण खर्चाच्या दृष्टीनेही परवडणारे आहे.
नैनिताल, उत्तराखंड : फिरायला शेकडो जागा, खरेदीसाठी उत्तम बाजार, खिशाला परवडेल अशी राहण्याची उत्तम सोय इथे मिळते.
शिमला, हिमाचल प्रदेश : ऐतिहासिक वास्तू, साहसी खेळ, वैविध्यपूर्ण जीवनशैली पर्यटकांना आकर्षून घेते.
मनाली, हिमाचल प्रदेश : केवळ हनिमूनसाठी नाही, तर सोलो ट्रिपच्या दृष्टीने निवांतपणा मिळवण्यासाठी मनालीला आठवडाभर सहज मुक्काम करू शकता.
मुन्नार, केरळ : चहाच्या बागा, धबधबा, निसर्गरम्य परिसर अशा समृद्ध ठिकाणी सोलो वा फॅमिलीसकट आयुष्यात एकदा तरी जायलाच हवे.
दार्जिलिंग, पश्चिम बंगाल : राहण्यासाठी स्वस्त, मस्त जागा, अस्सल चहाप्रेमींसाठी चहाचे मळे, टॉय ट्रेनची सफर आणि बरंच काही!
गंगटोक, सिक्कीम : तिबेटियन संस्कृती, स्वच्छ रस्ते, राहण्याची आणि फिरण्याची परवडणारी सोय सिक्कीमचे सौंदर्य दर्शवते.
कोडाईकॅनल, तामिळनाडू : घनदाट जंगल, धबधबे, फिरण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणं, दक्षिणेतील खिशाला परवडणारे हे ठिकाण आहे.
उटी, तामिळनाडू : बोटॅनिकल गार्डन, तलाव, खाद्य संस्कृती, भटकंती, निवांत वेळ घालवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
वाई, सातारा : महाराष्ट्रात फिरण्यासाठी पाचगणी, महाबळेश्वरचे नाव घेतले जाते, पण वाई हे सुद्धा फिरण्यासाठी, राहण्यासाठी स्वस्त, मस्त ठिकाण आहे.