पावसाळी सहलीसाठी १० बेस्ट स्पॉट!

जूनआधीच पावसाने हजेरी लावल्याने मौसम मस्ताना झाला आहे, अशात सहलीचे आयोजन करत असाल तर दहा ठिकाणांचा विचार करा. 

पावसाळ्यात निसर्ग आपल्याला खुणावतो, जवळ बोलावतो, व्यवस्थित सावधगिरी बाळगली तर पावसाळी सहलीचा आनंद घेता येतो. 

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पश्चिम घाटात तुम्हीदेखील सहलीचे नियोजन करत असाल तर ही दहा स्थळं तुमच्या बकेट लिस्ट मध्ये सामील करून घ्या. 

पश्चिम घाट नद्या, डोंगर, धबधबे, जंगल या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. 

महाबळेश्वर, महाराष्ट्र : मराठी कुटुंबांना हे ठिकाण नवीन नाही, पण पावसात याचे विलक्षण सौंदर्य अनुभवायलाच हवे. 

मुन्नार, केरळ : फोटोग्राफी आणि आरामाच्या दृष्टीने निवांत ठिकाण म्हणजे मुन्नार. हिरवळ पांघरलेले डोंगर आणि चहाचे मळे हे तिथले मुख्य आकर्षण!

कूर्ग, कर्नाटक : कूर्गला भारतातले स्कॉटलँड म्हणतात. निसर्गरम्य वातावरण, धबधबे, शांतता,  तिथे पिकणाऱ्या कॉफीची अस्सल चव माहोल बनवते. 

वालपराई, तामिळनाडू : कॉफी आणि चहाच्या लागवडीसाठी ओळखले जाणारे हे निसर्गरम्य ठिकाण सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठीही लोकप्रिय आहे. 

अगुंबे, कर्नाटक : दक्षिणेकडील 'चेरापुंजी' अशी ओळख असलेले हे ठिकाण पावसाळ्यात अतिशय खुलून, बहरून येते. पर्यटकांसाठी ती पर्वणी असते. 

उटी, तामिळनाडू : बोटॅनिकल गार्डन, प्रशस्त तलाव, चहाचे मळे, थंड हवेचे ठिकाण आणि निवांत क्षण अनुभवण्यासाठी उटीला जायला हवे. 

वायनाड, केरळ : केरळमधले हे हिल स्टेशन जंगल, नद्या, धबधबे, गुहा, हार्ट शेपचा तलाव, बोटिंग यासाठी लोकप्रिय आहे. 

कोडाईकॅनल, तामिळनाडू : शांत प्रशस्त तलाव, उंच कडांवरून कोसळणारे धबधबे, चहुबाजूने हिरवळ, पिकनिक मूडसाठी परफेक्ट वातावरण!

मोल्लेम, गोवा : भारतातला सर्वात उंच आणि दुधाळ 'दूधसागर धबधबा' हे इथले मुख्य आकर्षण आहेच आणि तिथली खाद्यसंस्कृतीही भन्नाट आहे. 

दांडेली, कर्नाटक : साहसी खेळांसाठी ओळखले जाणारे पश्चिम घाटातले हे ठिकाण पावसाळ्यात वेगळाच थ्रिल देणारे आहे. 

Click Here