तेजश्री प्रधान टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा आहे
मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानचे असंख्य चाहते आहेत. तिच्या अभिनय आणि सौंदर्याची कायमच स्तुती होते
तेजश्री सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत दिसत आहे.
यापूर्वी तिने अनेक मालिका केल्या. त्यातल्या 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेमुळे ती जास्त लोकप्रिय झाली.
पण तिची पहिली मालिका कोणती होती माहितीये का?
२००७ साली आलेली 'ह्या गोजिरवाण्या घरात' मालिका आठवतेय? त्यात तेजश्री पहिल्यांदाच दिसली होती
अनेक नवोदित कलाकारांना या मालिकेने संधी दिली होती
तेजश्री प्रधानने आज टेलिव्हिजनवर वेगळं स्थान निर्माण केलं