तेजश्री प्रधान मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आहे
'होणार सून मी या घरची' मालिकेने तेजश्रीला लोकप्रियता मिळवून दिली
जान्हवी नावाने तेजश्री घराघरात पोहोचली
पण तेजश्रीची पहिली मराठी मालिका आणि पहिला मराठी सिनेमा कोणता माहितीये का?
तेजश्रीने 'या गोजिरवाण्या घरात' या गाजलेल्या मालिकेतून अभिनयात पदार्पण केलं
नंतर ती 'तुझं नी माझं घर श्रीमंताचं', 'लेक लाडकी ह्या घरची' या मालिकांमध्येही दिसली.
२०१० साली तेजश्री मोठ्या पडद्यावर झळकली. 'झेंडा' या सुपरहिट सिनेमात तिने काम केलं.
यानंतर आजपर्यंत ती मालिका, सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे