तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत
तेजश्री प्रधान पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहे
सुबोध भावेसोबत ती 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत दिसणार आहे
याआधी तेजश्रीची याच वाहिनीवरील 'होणार सून मी या घरची' मालिका खूप गाजली
त्या मालिकेतील श्री-जान्हवीचे ठाण्यातील बसस्टॉपचे सीन्स नेहमी व्हायरल व्हायचे
आता आगामी मालिकेसाठी तेजश्री पुन्हा त्याच बस स्टॉपवर शूट करण्यासाठी पोहोचली आहे
त्या ठिकाणच्या तिच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. त्याचीच झलक तिने या फोटोंमधून दाखवली आहे.
तेजश्री आगामी मालिकेत स्वानंदी सरपोतदारच्या भूमिकेत दिसणार आहे