रोहितनंतर विराटचाही 'टेस्ट'ला टाटा; किती मिळणार पेन्शन?
महान खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
काही दिवसांपूर्वीच विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीसंदर्भातील बीसीसीआयला कळवल्याची माहिती समोर आली होती.
बीसीसीआयनं त्याला आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची विनंतीही केली होती. पण विराट कोहली आपल्या निर्णयावर ठाम राहिला.
अशातच आता पाहूया विराट कोहलीला यापुढे किती पेन्शन मिळू शकते?
बीसीसीआयच्या नियमानुसार २५ किंवा त्याच्यापेक्षा अधिक टेस्ट मॅच खेळणाऱ्या खेळाडूंना पेन्शन म्हणून महिन्याला ७० हजार रुपये मिळतात.
बीसीसीआय आपल्या माजी क्रिकेटर्सनाही पेन्शन देतं. विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर आता त्यालादेखील पेन्शन मिळणार आहे.
२०२२ मध्ये बीसीसीआयनं पेन्शनच्या नियमांमध्ये बदल केले होते. टॉप ग्रेड पेन्शनसाठी खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर २५ सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणं आवश्यक होतं.
विराट आतापर्यंत ३०२ एकदिवसीय आणि १२५ टी २० सामने खेळला आहे. यामुसार त्याला ७० हजार रुपयांचं पेन्श मिळू शकतं.